Sambhaji Bhide : “महात्मा गांधींचे वडील मुस्लीम जमीनदार”, भिडेंनी तोडले अकलेचे तारे

 Sambhaji Bhide Controversy :

नेहमीच सतत जाहीर कार्यक्रमाद्वारे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा महात्मा गांधी व त्यांच्या परिवाराविषयी वादग्रस्त व संताप आणणारे वक्तव्य केले आहे, ‘महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास गांधी यांचे वडील नाहीत. त्यांचे खरे वडील हे एक मुस्लीम जमीनदार आहे’, असे अकलेचे तारे संभाजी भिडे यांनी तोडले.

शरद पोंक्षेंची मुलगी झाली वैमानिक; म्हणाले, “कोणतीही सवलत,आरक्षण नसताना मिळवले यश''.




मणिपूर मधील तो व्हायरल व्हिडीओ मे महिन्यातील. महिलांना नग्न फिरवणारे कोण? संपुर्ण घटनाक्रम जाणुन घ्या.Manipur Violence

अमरावती शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भिडेंनी हे वक्तव्य केलं असून, यावर सर्व स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
त्याच्याही कार्यक्रमांमध्ये संभाजी भिडे म्हणाले की, “महात्मा गांधींचे जे वडील म्हटले जातात, ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधींच्या आईला पळवून घरी आणले होते.” संभाजी भिडे एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, “महात्मा गांधी यांच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नाहीत, ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. महात्मा गांधींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. माझ्याकडे याबद्दल पुरावे देखील आहे”, असं विधान भिडे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने